12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन: मोफत पोलीस भरती प्रशिक्षण 2025 सर्व सुविधा सह PRTC  Bharti  2025

PRTC BHARTI 2025 : नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना वाटते की आपण देशाचे रक्षण करावे मग ते पोलीस असो या सैनिक असो पण चांगली तयारी कशी करावी हे आपल्याला माहीत नसते बाकीचे मुलं पैसे भरून अकॅडमी लावता पण तुम्हाला जर खरोखरच पोलीस भरती तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी चांगले संधी घेऊन आलेलो आहे. पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण देण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. ज्याची 12 वी  झालेले आहे त्या विद्यार्थ्यांना हा अर्ज करता येईल. तर तुम्ही पात्र असेल तर तुम्ही तिथल्या प्रशिक्षण केंद्राला जाऊन भेट द्या हे मुदत 25 मार्च 2025 पर्यंतच दिलेली आहे आणि 1 एप्रिल 2025 पासून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयोमर्यादा, आणि कोणकोणते सुविधा भेटणार आहेत, याची आपण पुढे सविस्तर माहिती बघणार आहोत.

महत्त्वाची माहिती

  • प्रशिक्षणाचा कालावधी 4 महिने राहील
  • अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने घेतला जातो
  • निवडीची प्रक्रिया ही 25 मार्च 2025 सकाळी 8 वाजेपासून सुरू होईल
  • प्रशिक्षणाची सुरुवात ही 1 एप्रिल 2025 रोजी पासून सुरू करण्यात येईल
  • प्रशिक्षण च्या वेळी अनेक सुविधा दिल्या जातात त्यामध्ये मोफत जेवण मोफत कपडे मोफत राहण्याचे निवास यांसारख्या सुविधा दिल्या जातात
  • मोफत अभ्यासाचे प्रशिक्षण दिले जाते

लागणारी कागदपत्रे

  • दहावी व बारावी चे मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नाव नोंदणी केलेले प्रमाणपत्र
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • हे पाच आवश्यक कागदपत्रे आहेत

संधी कोणाला मिळेल

हे प्रशिक्षण दर चार महिन्यांनी मुलांना किंवा मुलींना असे चालू असते तर ह्या चार महिन्यासाठी फक्त मुलींसाठी प्रशिक्षण देण्यात येईल.

तर  ST प्रवर्गातील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात येईल.

शारीरिक पात्रता

  • वय किमान 18 ते 25 दरम्यान असावा
  • उंची किमान 150 सेंटिमीटर असणे आवश्यक आहे
  • वजन हे 50 kg असणे आवश्यक आहे.
  • बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • ST  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

अर्ज कुठे कराल

केंद्रप्रमुख, पोलीस तथा सैन्य दल भरती पूर्वी प्रशिक्षण केंद्र, आरटीओ जवळ, पेठ रोड, नाशिक या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.

संपर्कासाठी मोबाईल क्रमांक

8007980916,  9420269023 ह्या नंबरावर संपर्क साधा.

फक्त आज आणि उद्याचा दिवस राहिलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन संपर्क साधा आणि तुमच्या मित्रांनाही कळवा.

Leave a Comment