By UMESH MAHALE
Publish on 11 april 2025
नमस्कार मित्रांनो :– आपल्याला फार्मर आयडी नोंदणी करण्यापूर्वी खूप सारे योजनांचा लाभ मिळत होता आणि मिळत आहे आता ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कोणता तो म्हणजे शेतकऱ्यांना शासकीय कृषी योजनांचा लवकरात लवकर लाभ घेण्यासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. तर शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 15 एप्रिल 2025 या तारखेपासून शेतकऱ्या फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे जर हा फार्मर आयडी नसेल तर त्यांना कोणते प्रकारचा कोणत्या योजनांचा लाभ घेता येणार नाही.
प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या माहिती नुसार एक युनिक शेतकरी आयडी कार्ड हा देण्यात येणार आहे.
फार्मर आयडी ची गरज का आहे ?
- या फार्मर आयुर्वेदिक आपल्याला विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येईल
- आपल्या जमीन व पिकाच्या माहितीच्या आधारे एक युनिक आयडी देण्यात येईल.
अर्ज कुठे करावा ?
फार्मर आयडी याचा अर्ज CSC केंद्र , ग्राम कृषी समिती आणि स्थानिक कृषी कार्यालय यांच्या माध्यमातून अर्ज करावा
फायदे
- या फार्मर आयडी द्वारे आपल्याला जलद योजनेचा लाभ घेता येईल.
- पिकांच्या अचूक निरीक्षण करता येईल.
- राज्यातील सर्व शासकीय योजनांसाठी एकसंध ओळख राहील.
जर फार्मर आयडी काढला नसेल तर काय होईल ?
हे बघा शेतकरी बांधवांनो जर तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्हाला कोणत्या योजनांचा लाभ घेता येणार नाही उदाहरणार्थ खत बी बियाण्यांचे अनुदान, आपली कर्जमाफी, सरकारकडून मिळणारे अनुदान, पिक विमा तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ आपल्याला मिळणार नाही.
जर तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या csc केंद्राला भेट देऊन तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर आयडी काढण्यासाठी खाली त्यांचे अधिकृत वेबसाईट दिलेली आहे तिथे जाऊन ते फार्मर आयडी काढून घ्या. https://mhfr.agristick.gov.in/
टीप..
- शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर फार्मर आयडी साठी नोंदणी करावी
- कारण 15 एप्रिल 2025 पासून फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येणार आहे
- जर तुम्ही नोंदणी केले नाही तर तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ भेटणार नाही
- या फार्मर आयडीची नोंदणी तुम्ही जवळच्या CSC केंद्रा जवळ जाऊन, ग्राम कृषी समिती, स्थानिक कृषी कार्यालय मध्ये जाऊन तुम्ही फार्मर आयडी साठी नोंदणी करू शकता.
तुम्ही तुमचा मुलाचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.