RRB ALP Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, रेल्वे मध्ये वर्षाला खूप पद भरती निघत आहे. तर अशीच एक पदांची भरती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत
तुम्हाला जर भारतीय रेल्वेत नोकरी मिळवायची असेल, तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. 2025 मध्ये भारतीय रेल्वेच्या सहायक लोको पायलट (ALP) पदासाठी एक मोठी भरती निघाली आहे. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे. तर तुम्हाला या भरतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही त्वरित अर्ज करा. पण अर्ज करण्यासाठी या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता याची माहिती दिलेली नाही ती थोड्या दिवसांनी आपल्याला कळेल संपूर्ण माहिती बघायची असेल तर तुम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्या. पण तुम्ही या भरती बद्दल अपडेट राहा. या भरतीची सविस्ते माहिती आपण पुढे बघू.
पदांची नावे आणि पदसंख्या.
या रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये एकच पदसंख्या दिलेली आहे आणि त्या पद संकेत खूप जागा दिलेले आहेत. ते आपण पुढे बघू
- पदांचे नाव :– असिस्टंट लोको पायलट (ALP)
- पदसंख्या:- 9900
शैक्षणिक पात्रता
सध्या तरी या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख केलेला नाही. पण थोड्या दिवसांनी या जाहिरात मध्ये त्याचा उल्लेख केला जाईल तर तुम्ही सर्वांनी या जाहिरातीबद्दल अपडेट राहा.
वयाची अट
या पदभारतीमध्ये अर्ज करण्यासाठी किती वयाची गरज आहे याची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे.
- 01 जुलै 2025 रोजी वय 18 ते 30 वर्षे असावे.
- SC/ST: 5 वर्षांची सूट दिलेली आहे
- OBC: 3 वर्षांची सूट दिलेल्या आहे
नोकरीचे ठिकाण
नोकरीचे ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये राहील. तुम्हाला कोणत्याही राज्याचा फॉर्म भरता येईल आणि तिथे तुम्हाला जॉब करता येईल
शुल्क किती आकारला जाईल
- General/OBC/EWS: ₹500/-
- SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मे 2025 हे दिलेले आहे
सध्या तरी परीक्षा ही कधी होईल या जाहिरातीमध्ये नमूद केलेले नाही ते आपल्याला लवकरात लवकर कळेल.
मित्रांनो, भारतीय रेल्वे मध्ये नोकरी मिळवणे हे तुमच्यासाठी एक मोठे गोल ठरू शकते. म्हणूनच, जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल, तर वेळेत अर्ज करा आणि यशस्वी होण्यासाठी तयारीला लागा! कारण एवढ्या मोठ्या पद भरतीची संधी सारखी सारखी येत नाही तर तुम्ही चांगला अभ्यास करा
तर ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या संधीचा लाभ घेता येईल
धन्यवाद.