MHT – CET Hall Ticket 2025: परीक्षेच्या हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहे पण कसे ? सविस्तर  माहिती!

MHT – CET Hall Ticket Download 2025: नमस्कार मित्रांनो, तुम्ही MHT – CET 2025 या परीक्षेचा फॉर्म भरला आहे का तर ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला असेल तर त्याच्यासाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे. तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने अनेक अनेक परीक्षांचे हॉल तिकीट जाहीर केलेले आहे. त्यापैकी एमएचटी-सीईटी या परीक्षेचे हॉल तिकीट आलेले आहे तर  सर्वांनी परीक्षेच्या तारखेनुसार तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे. कारण याची एक  कॉपी परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर तुम्हीच परीक्षा देणारा आहात का का तुमच्याबद्दल दुसरा कोणी परीक्षा केंद्रावर पेपर द्यायला आला आहे का हे कन्फर्म करण्यासाठी हे प्रिंट आपल्याला आवश्यक लागते. तसेच त्याच्यावर तुमचा बैठक क्रमांक हा असतो. त्याच्यामुळे हॉल तिकीट काढणे गरजेचे आहे तर मग हॉल तिकीट कसा काढायचा याची सविस्तर माहिती आपण पुढे बघू.

MHT CET ही परीक्षा 19 मार्च 2025 पासून सुरू झालेले आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित आपला हॉल तिकीट काढून घ्यावा.

MHT – CET 2025 परीक्षा बद्दल महत्त्वाची माहिती.

MHT CET 2025 अंतर्गत खूप साऱ्या परीक्षा घेतल्या  जातात. आणि या सीईटी दवारे वेगवेगळ्या शिक्षण क्षेत्रात मुलांना निवडले जातात. तर ह्या वर्षी खूप सार्‍या मुलांनी फॉर्म भरलेला आहे म्हणजेच 13 लाख 43 हजार 413 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. 

तर सर्वात जास्त फॉर्म हे MHT CET  या परीक्षेसाठी फॉर्म आलेले आहेत म्हणजेच 7 लाख 65 हजार 338 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.

MHT CET 2025 परीक्षेसाठी वेळापत्रक

  • MAH CET :-  23 मार्च 2025
  • MAH-MBA/ MMS CET :- 1 ते 3 एप्रिल 2025
  • MAH-MHT CET (PCB) :- 9 ते 17 एप्रिल 2025
  • MAH-MHT CET (PCM) :- 19 ते 27 एप्रिल  2025

MHT-CET या परीक्षेचे हॉल तिकीट कसे डाऊनलोड कराल.

MHT – CET 2025 चे हॉल तिकीट डाउनलोड करणे खूप सोपा आहे तुम्हाला कोणत्याही प्रकार चिंता करण्याची गरज नाही तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईल मध्ये ठराविक माहिती टाकून तुम्ही तुमच्या हॉल तिकीट काढू शकता.

या परीक्षेचे हॉल तिकीट कसे काढायचे ते आपण पुढे सविस्तर बघू.

  • हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुम्ही त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. https://cetcell.mahacet.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
  • त्यांच्या अधिकृत साईटला जाऊन MHT CET 2025 Hall Ticket या लिंक वरती जा व क्लिक करा.
  • तुम्ही ज्या दिवशी अर्ज केला त्या दिवशी तुम्हाला एक अर्ज क्रमांक दिला असेल तो अर्ज क्रमांक आणि तिथे तयार केलेला पासवर्ड टाका.
  • ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर तुमचा हॉल तिकीट स्क्रीन वरती येईल ते हॉल तिकीट तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून ठेवा.

तर बाकीचे हॉल तिकीट हे आधीच उपलब्ध झालेले आहेत. म्हणजेच MAH – M.Ed आणि MAH -M.P.Ed CET यांचे हॉल तिकीट आधीच आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यांचा अर्ज केलेला असेल त्यांनी हॉल तिकीट काढून घ्यावे.

महत्वाचे टीप

परीक्षेला जाण्याच्या अगोदर तुम्ही तुमचा हॉल तिकीट नीट चेक करा

परीक्षेला जाताना हॉल तिकीट विसरू नका

Leave a Comment